EXCLUSIVE : व्हॅलेंटाईन विकला रिलीज होणार शिव-वीणाचं रोमँटिक गाणं

By  
on  

बिग बॉस या शोच्या घरात मैत्री होते, शत्रूही होतात आणि प्रेमही जुळतं. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वातही ते पाहायला मिळालं. एक जोडी या पर्वात चांगलीच चर्चेत राहिली. शिव ठाकरे आणि वीणा जगताप या दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याचं प्रेमात रुपांतर झालं. त्यांची ही केमिस्ट्री प्रेक्षकांनाही आवडली. शिव ठाकरे दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आणि मात्र बिग बॉस शोमुळे त्याच्या आयुष्यात वीणाची एन्ट्रीही झाली. सोशल मिडीयावरही दोघांचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच चर्चेत असतात. आणि आता या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे.

व्हॅलेंटाईन डे लवकरच येत आहे आणि याच निमित्ताने शिव आणि वीणाचं एक रोमँटिक गाणं रिलीज होत आहे. व्हॅलेंटाईन विकला हे गाणं रिलीज होणार आहे. सागरिका म्युझिकने हे गाणं केलं असून ‘कसा चंद्र’ असे या गाण्याचे बोल आहेत. स्वप्निल बांदोडकरने हे गाणं गायलं असून संदीप खरेने हे गाणं लिहीलं आहे आणि अवधुत गुप्तेने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यात शिव-वीणाचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार असून त्यांचा खास डान्सही यात पाहायला मिळेल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Coming soon ️........ 14th FEB ️Guess who...?? #dreamer #ziddi #marathimulga #

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9) on

नुकतच शीवने त्याच्या सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट करत ओळखा पाहू (guess who?) असं म्हटलं होतं. या फोटोत वीणाच असल्याचं आता समोर येत आहे. तेव्हा शिव आणि वीणाची रोमँटिंक केमिस्ट्री यंदा व्हॅलेंटाईन वीकला पाहायला मिळेल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Dinner Date @shivthakare9 ️

A post shared by Veena Nirmala Mahendra Jagtap (@veenie.j) on

नुकतच एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या यादीनुसार दोघांनीही मोस्ट डिझायरेबल पुरुष आणि मोस्ट डिझायरेबल महिला या यादीत नंबर वनची जागा मिळवली आहे. 

Recommended

Loading...
Share