EXCLUSIVE : हिंदी रिएलिटी शोमध्ये झळकणार मराठी बिग बॉस फेम हिना पांचाळ

By  
on  

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात आलेल्या एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाची जोरदार चर्चा झाली होती. ही वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणजे हिना पांचाळ. हुबेहुब बॉलिवुड स्टार मलायका अरोरा सारखी दिसणारी हिना तिच्या डान्समुळे, हटके कपड्यांमुळे आणि फिटनेसमुळे बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात चर्चेत राहिली. बऱ्याच मराठी सिनेमांमध्ये हिनाने आयटम साँगही केले आहेत. आणि आता हिना लवकरच एका नव्या शोमध्ये दिसणार असल्याची माहिती पिपींगमून मराठीला मिळाली आहे. 

लवकरच एका हिंदी रिएलिटी शोमध्ये हिना झळकणार असल्याचं समोर आलं आहे. 'मुझसे शादी करोगे' असं या शोचं नाव असून हिंदी बिग बॉसच्या 13व्या सिझनमधील शेहनाझ आणि पारस या शोमध्ये आहे. दोघांसाठी वर -वधू शोधण्यासाठीचा हा शो आहे. याआधी हिनाने ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोच्या मंचावर मलायका अरोरा समोर परफॉर्म केलं होतं. तेव्हा हिनाला पाहून मलायकाही अवाक झाली होती. 


टिक टॉक या एपवरही हिनाचे बरेच व्हिडीओ पाहायला मिळतात. शिवाय सोशल मिडीयावरील तिचे बोल्ड फोटो चर्चेत असतात. 

Recommended

Loading...
Share