By  
on  

EXCLUSIVE : “मला जास्त मेकअप करायला आवडत नाहीत, ते चॅलेंजींग होतं..” पोतराजच्या भूमिकेत दिसला हार्दिक जोशी 

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेला सध्या वेगळं वळणं मिळालेलं पाहायला मिळतय. सध्या चित्रीकरण बंद असलं तरी बँकिंग केलेले एपिसोड पाहायला मिळत आहेत. या मालिकेत राणाचे वेगवेगळे रुप सध्या पाहायला मिळत आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी हा पोतराजच्या भूमिकेत दिसला. कडक लक्ष्मी साकारतानाचा अनुभव हार्दिकने पिपींगमून मराठीशी एक्सक्लुझिव्ह शेयर केलाय. 

कडक लक्ष्मी भूमिकेविषयी सांगताना हार्दिक म्हणतो की, “सुरुवातीला मला माहितचं नव्हतं की कशी भूमिका असेल. मग गेटअप वैगेरे करायला सुरुवात केली. नेटवर काही व्हिडीओ पाहिले की त्यांचा लुक कसा असतो, ते पायातल्या पायात कसे नाचतात ते व्हिडीओ पाहून शिकलो. माझ्या पद्धतिने करण्याचा  प्रयत्न केला. कुणाच्याही भावना न दुखावता ते साकारण्याचा प्रयत्न केला. हे साकारण्याआधी नाना पाटेकर यांचही ‘यशवंत’ सिनेमातील ते कॅरेक्टर पाहिलं. विविध गेटअप या मालिकेत आणखी पाहायला मिळतील.”


या मालिकेत हार्दिक जोशी आत्तापर्यंत तब्बल 12 विविध गेटअप आणि भूमिकांमध्ये दिसला आहे. यानंतरही आणखी काही वेगवेगळ पेहराव तो करणार असल्याचं त्याने सांगीतलं. याविषयी हार्दिक म्हटतो की, “मजा येतेय वेगळं करायला. मी वासूदेवही साकारले होते. आगामी भागात मी शुद्ध मराठी बोलतानाही  दिसेल. मला हे करायला जास्त मजा येत आहे. मला फारसं मेकअप करायला आवडत नाही, त्यामुळे ते चॅलेंजींग होतं. तासन तास मेकअपसाठी बसून वेगवेगळे रुप साकारायला मजा आली. हार्दिक म्हणून आगामी काळात आणखी काही वेगळं करण्याचा प्रयत्न करेल”


‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून हार्दिकला राणा दा अशी ओळख मिळाली असून त्याला या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळाली आहे. कोरोनापासून बचावासाठी ही कलाकार मंडळी सध्या आपल्या घरात बसणं पसंत करत आहेत. हार्दिकही मुंबईतल्या आपल्या घरी कुटुंबासोबत वेळ घालवतोय. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive