मातृ दिनाच्या निमित्ताने अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिची आई गौरी खानविलकर यांनी पिपींगमून मराठीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अमृताने आईचं तिच्या करियरमधील योगदान, मातृत्व आणि बऱ्याच गोष्टी सांगीतल्या. तर अमृताच्या आईनेही अमृताविषयी बऱ्याच गोष्टी सांगीतल्या. अमृताच्या कामाविषयी आईकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियेविषयी अमृता सांगते की, “मम्मीला माझं कोणतं काम आवडतं तर ते काम ती वारंवार बघते. माझा गैर हा चित्रपट जवळपास तिने तेरा वेळा पाहिला असेल. राझी, कट्यार काळजात घुसली हे सिनेमेही तिने खूप वेळा पाहिले आहेत.”
अमृताची आई गौरी यांनीही यावेळी अमृताविषयी कौतुक करताना या गोष्टी सांगीतल्या की, “अमृताची ग्रास्पिंग पावर खूप छान आहे. भाषा, दिसणं किंवा एका भूमिकेवर कामही ती खूप मनापासून करते.”
अमृता तिच्या करियरमधील यशाचं श्रेयही तिच्या आईला देते. ती म्हणते की, “आत्तापर्यंत मी जे काही केलय किंवा जे काही करू शकले ते तिच्या पाठींब्यामुळे आहे. जेव्हा मी मुंबईला राहायचा निर्णय घेतला तेव्हा मम्मी पप्पांनी माझ्यासाठी खूप त्याग केलाय. मम्मीने तेव्हापासून सगळं सांभाळय. ऑडिशन्सलाही ती सोबत असायची. ती कायम सोबत होती आणि आहे म्हणूनच या यशाचं श्रेय मी तिला देते.”अभिनय क्षेत्रात येण्याची इच्छा जेव्हा अमृताने आईकडे व्यक्त केली होती त्याविषयी गौरी म्हणतात की, “अमृताने जेव्हा आम्हाला सांगीतलं की मला या क्षेत्रात काम करायचय तेव्हा आम्ही घाबरलो. कारण मध्यमवर्गीय असल्यामुळे आमच्या घरात कुणीच एक्टिंग करणारं वैगेर नव्हतं. मग आम्ही तिला नाराज नाही केलं. मग तिच्या पप्पांनी असं ठरवलं की मी तिच्यासोबत कायम रहायचं.”
मातृत्वाविषयी अमृताला विचारलं असता ती म्हणते की, “मला मैत्रीण सोनाली खरे आणि धाकटी बहीण अदिती म्हणते की तू खूप स्ट्रिक्ट आई होणारेस. मी खूप शिस्तप्रिय आणि स्ट्रिक्ट आई होणार आहे. आई होणं ही सगळ्यात सुंदर भावना आहे आणि ती मला अनुभवायची आहे. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा येईल तेव्हा बघू काय होतं ते.”करियरमधील महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा होते का ? यावर अमृताची आई गौरी म्हणतात की, “अमृताचे निर्णय ती स्वत:च घेते. त्यामुळे असं कधी नाही झालय की मी कोणत्या गोष्टीला नकार दिलाय. पण आम्ही दोघी कधी मग एकमेकींना विचारून बसून बोलतो आणि ती तिचे निर्णय ती घेते.
अमृताचे तिच्या आईसोबतचे व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मिडीयावर चर्चेत असतात. आई-लेकीची ही जोडी अमृताच्या चाहत्यांनाही प्रचंड आवडते.