वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा उत्तम अभिनेता जितेंद्र जोशी आता ‘बेताल’ या वेब सिरीजमधून खलनायकी भूमिकेत देसतोय. यासाठी जितेंद्रला प्रेक्षकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. पिपींगमून मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत याविषयी जितेंद्र सांगतो की, “एक सुंदर प्रतिक्रिया अशी आली की, काटेकर मेल्यावर तो का मेला याचं वाईट वाटत होतं. आणि हे बघत असताना हा कधी मरेल याची वाट बघत होते. या टोकाच्या भूमिका आहेत. हे ऐकत असताना बरं वाटतं. विविधं प्रकारची मतं लोकं व्यक्त करतात.”
बेताल ही किंग खान शाहरुखच्या रेड चिलीजची वेब सिरीज आहे. आणि म्हणूनच चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतरच्या पार्टीत किंग खान शाहरुखने या टीमची भेट घेतली होती. त्यावेळचा अनुभवही जितेंद्रने शेयर केला.
“आम्ही शाहरुखच्या प्रेमात असलेली माणसं आहोत. आनंद वाटतो ज्याला लहानपणापासून बघतोय त्याला भेटतो तेव्हा आनंद होतो. एखादा माणून जिथे तिथे आहे ते का आहे हा मोठा माणूस मोठा झाला तो मोठा का आहे हे लक्षात येतं आपल्या.”
यावेळी जितेंद्रने बेतालच्या सेटवरील आठवणींनाही उजाळा दिला. तो म्हणतो की, “ आम्ही सेटवर काही जण आजारी सुद्धा पडले होतो. त्या कालावधीत तीन दिवस काम बंद होतं. पावसापाण्यातही आम्ही शूट केलं होतं. लोणावळा, खंडाळा, इगतपुरी आणि यशराज स्टुडीओमध्ये आम्ही चित्रीकरण केलं. जवळपास 48 दिवस आम्ही हे चार भाग चित्रीत केलं आहे. मला हे करायला उद्युक्त करणारा माणूस निखील महाजन होता. त्याच्यासोबत हेही काम करता आलं याचा आनंद आहे.”
शिवाय स्वत: बेतालसारख्या हॉरर सिरीजचा भाग असतानाही जितेंद्र जोशी खऱ्या आयुष्यात हॉरर पाहत नसल्याचं आणि ते पाहायला आवडत नसल्याचही तो म्हटला.