EXCLUSIVE : सगळे कलाकार सरोज खान यांच्यासाठी एकसमान असायचे - अमृता खानविलकर 

By  
on  

प्रसिध्द नृत्यदिग्दर्शिक, मास्टरजी सरोज खान यांच्या निधनानं नृत्याशी निगडीत प्रत्येक कलाकार दु:खी झालाय. अभिनेत्री अमृता खानविलकरला डीआयडी आणि इतर रिएलिटी शोच्या निमित्ताने सरोज खान यांना भेटण्याची संधी मिळाली होती. सरोज खान अमृताशी मराठीत बोलत असे. त्या अमृताला भेटल्यानंतर विसरायच्या नाही. 

पिपींगमून मराठीशी बोलताना अमृताने सरोज खान यांना श्रध्दांजली अर्पण करत या मोठ्या कलाकारासोबतचा अनुभव सांगीतला.

 

अमृता सांगते की, “डीआयडीच्या वेळी मी भेटले होते त्यांना आणि त्यांची एक खासियत होती की त्या सगळ्यांमध्ये एक कलाकार बघायच्या. एकतर त्यांच्यात आपुलकी असायची कायम.  सगळे कलाकार त्यांच्यासाठी खूप बरोबरीचे असायचे. डीआयडीला आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांच्या नजरेतून कधीच कुठला कलाकार सुटला नाही असं मला वाटतं. त्यांना भेटलं की त्यांच्या पाया पडल्याशिवाय कुणीच राहू शकत नाही. मला त्यांना भेटण्याची दोन ते तीन वेळा संधी मिळाली होती. आणि त्यांना तुम्ही लक्षात राहता त्या विसरत नाही. या मोठ्या लोकांचं मला खूप कौतुक वाटत की ते विसरत नाहीत त्या केवढ्या लोकांना भेटत असतील पण त्या विसरत नाहीत. त्या माझ्याशी मराठीत बोलायच्या. हे सगळं अविस्मरणीय होतं. त्या आपल्याशी आपल्या भाषेत बोलतात आणि खूप आपुलकीने बोलतात. मला त्यांच्यासोबत खूप छान अनुभव आले. ही जी मोठी माणसं लेजंड्री माणसं म्हणतो ना आपण ती तुम्हाला आयुष्यात एक वेगळा अनुभव देऊन जातात, ते मात्र खरय.”

 

Recommended

Loading...
Share