EXCLUSIVE : त्या मला हसून म्हणाल्या होत्या तू खूप चांगलं करतेस आणि ग्रेसफुल आहेस – संस्कृती बालगुडे 

By  
on  

निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांच्या 'मराठी तारका' या कार्यक्रमाच्या एका शोसाठी सरोज खान यांनी नृत्य दिग्दर्शन केलं होतं. यावेळी मराठी तारकांनी त्यांच्यासमोर परफॉर्म केलं होतं. या तारकांपैकीच एक अभिनेत्री संस्कृती बालगुडेचं सरोजजींनी कौतुक केलं होतं.

पिपींगमून मराठीशी बोलताना संस्कृतीने ही खास आठवण शेयर केली. ती म्हणते की, “त्या कोरिओग्राफीबद्दल दोन तीन शब्द माझ्याशी बोलल्या होत्या. सगळ्यात आधी मला त्यांची प्रचंड भिती वाटली होती. कारण त्या तिथे बसल्या होत्या आणि आम्हाला त्यांच्यासमोर परफॉर्म करायला लावलं होतं जे आम्हाला असिस्टंनी शिकवलं होतं. जेव्हा मी परफॉर्म केलं तेव्हा त्या मला हसून म्हणाल्या होत्या तू खूप चांगलं करतेस आणि ग्रेसफुल आहेस. आणि तेव्हा मला असं झालं की आपल्याला परफॉर्मर म्हणून पावती मिळाली. त्या मला म्हणाल्या की एक दोन स्टेप्स आहेत ज्या तू अशा केल्या पाहिजेत तेवढ्या बोलल्या. तेव्हा महेश सर मला म्हटले होते की जेव्हा सरोजजींना रिहर्सल दरम्यान एका मुलाखतीत विचारलं की तुमचं या मुलींमध्ये सगळ्यात फेव्हरेट कोण आहे त्यांनी माझं नाव घेतलं होतं. पण जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा तुमची जबाबदारीही तितकीच वाढते."

संस्कृती पुढे सांगते की, "खूपच कमाल होत्या. त्या सरोज खान का आहेत हे त्या पावलोपावली दाखवून द्यायच्या. आमच्या टेक्निकल्सला सुध्दा सगळ्यात आधी त्या हजर होत्या. त्या सगळ्यात वेळेवर असायच्या. त्यांच्यासोबत बोलता आलं, त्यांच्या कोरिओग्राफीवर परफॉर्म करता आलं ही माझ्यासाठी खरतर खूप मोठी गोष्ट आहे. एक इच्छा असते की काही व्यक्तिंसोबत काम करायचं असतं, त्यापैकीच त्या एक होत्या. आणि माझी ती इच्छा पूर्ण झाली. पण सरोजजी यांची एक स्टाईल होती. तशी कोरिओग्राफी पुन्हा कुणालाच जमणार नाही. त्यांच्या जाण्याचं खूप वाईट वाटतय.”
 

Recommended

Loading...
Share