पाहा व्हिडीओ : या मराठी अभिनेत्रीच्या नृत्याचं सरोज खान यांनी केलं होतं कौतुक, ऐका काय म्हटली अभिनेत्री

By  
on  

सुप्रसिध्द कोरिओग्राफर सरोज खान यांची मास्टरजी म्हणून ओळख होती. त्यांच्यासोबत काम करण्याची, त्यांनी कोरिओग्राफ केलेल्या डान्सवर परफॉर्म करण्याची ज्यांना संधी मिळाली ते स्वत:ला भाग्यवान समजतात. यापैकीच एक आहे अभिनेत्री संस्कृती बालगुडे. मराठी तारका या कार्यक्रमासाठी मागील वर्षी सरोज खान यांनी कोरिओग्राफी केली होती. या कार्यक्रमात संस्कृतीनेही परफॉर्म केलं होतं. 

पिपींगमून मराठीशी बोलताना संस्कृतीने ही आठवण शेयर केली. ती सांगते की, "खूपच कमाल होत्या. त्या सरोज खान का आहेत हे त्या पावलोपावली दाखवून द्यायच्या. आमच्या टेक्निकल्सला सुध्दा सगळ्यात आधी त्या हजर होत्या. त्या सगळ्यात वेळेवर असायच्या. त्यांच्यासोबत बोलता आलं, त्यांच्या कोरिओग्राफीवर परफॉर्म करता आलं ही माझ्यासाठी खरतर खूप मोठी गोष्ट आहे. एक इच्छा असते की काही व्यक्तिंसोबत काम करायचं असतं, त्यापैकीच त्या एक होत्या."

 

Recommended

Loading...
Share