PeepingMoon Exclusive: दीपिकाला मी सहापेक्षा अधिक वेळा ड्रग्ज पुरवले, करिश्मा प्रकाशची एनसीबीकडे कबुली

By  
on  

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह पाठोपाठ करिश्मा प्रकाशदेखील चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात आज 25 सप्टेंबरला ादाखल झाली आहे. करिश्मा प्रकाश ही अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर असून ड्रग्स प्रकरणात तिचंदेखील नाव रडारवर आहे.

PeepingMoon.com ला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार , करिश्माने एनसीबीच्या चौकशीत काही  खळबजनक दावे केले आहेत. दीपिकाला मी सहापेक्षा अधिक वेळा ड्रग्ज पुरवले होते अशी करिश्मा प्रकाशने एनसीबीकडे कबुलीच दिली आहे. तसंच करिश्माने  हेही सांगितलं की, "दीपिका एका  व्हॉट्सएप ग्रुपची एडमिन होती. बिझनेससाठी हा ग्रुप असला तरी तिथे फक्त ड्रग्जबद्दलचं बोललं जायचं. दीपिका तिथे माल म्हणजे ड्रग्जची विचारणा करायची."

 

करिश्माने अभिनेत्री दीपिका पादुकोणला सहा पेक्षा अधिक वेळा तिच्या कारमध्ये जाऊन ड्रग्ज सप्लाय केले आहेत, असं एनसीबीला तिने सांगितल्याचं सूत्रांकडून कळतंय. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्सच्या अँगलबाबत एनसीबी तपास करत आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली. सुशांतची मॅनेजर जया साहाच्या चौकशीदरम्यान दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचंही नाव समोर आलं.

 

 

Recommended

Loading...
Share