By  
on  

PeepingMoon Exclusive: संजय लीला भंसाळी 'हीरा मंडी'ला एका नेटफ्लिक्स सिनेमाच्या रुपात पुनरुज्जीवित करणार ?

संजय लीला भंसाळी यांचा महत्त्वाचा प्रोजेक्ट हीरा मंडी हा 13 वर्षांनंतर अखेर तयार होण्यासाठी सज्ज असल्याचं चित्र पाहायला मिळतय. Peepingmoon.com ला माहिती मिळाली आहे की भंसाळी आता एका वेब फिल्मच्या रुपात पीरियड ड्रामा बनवत आहेत. प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्ससोबत याला समोर आणण्यासाठी हात मिळवणी केली आहे. भंसाळी आणि त्यांची टीमने याविषयी मौन बाळगलं असलं तरी इंडस्ट्रीमध्ये असलेल्या सूत्रांनी याविषयी पुष्टीकरण केलं आहे की या प्रोजेक्टला पुनरुज्जीवित करण्यात येत आहे. ज्याचं चित्रीकरण 2021 च्या पहिल्या तीन महिन्यात होण्याची शक्यता आहे. 

सूत्रांचं असं म्हणणं आहे की, "भंसाळी आणि त्यांची प्रॉडक्शन कंपनीचे सीईओ प्रेरणा सिंह मागीक काही काळापासून नेटफ्लिक्ससोबत बातचीत करत आहे. आणि त्यांनी नुकतीच हीरा मंडीसोबत काम करण्यास सहमती दर्शवली आहे. जो भंसाळींसाठी एक पॅशन प्रोजेक्ट आहे. या सिनेमाला मोठ्या प्रमाणात कस्टम ड्रामाच्या रुपात सादर करण्यात आलं आहे, ज्यात संजय लीला भंसाळीच्या अंदाजाती सर्व तत्त्व असतील. मात्र ते स्वत: याचं दिग्दर्शन करणार नाहीत."

 भंसाळी यांनी हीरा मंडीसाठी विभु पुरीला दिग्दर्शनाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. ज्यांनी हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या गुजारिश या सिनेमाचे डायलॉग लिहीले होते. पुरी यांनी आयुष्मान खुरानाचा सिनेमा हवाइजादे मधून दिग्दर्शनात डेब्यू केला होता. त्यांनी आता सुरुवातीपासूनच तयारी सुरु केली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच ते या सिनेाच्या प्री-प्रॉडक्शनवर काम करायला सुरुवात करतील. त्यांच्या हनीमूनवरून परतल्यानंतर ते या प्रोजेक्टच्या कास्टचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

 सूत्रांनी पुढे सांगीतलय की पुनरुज्जीवित होत असलेल्या 'हीरा मंडी' मध्ये लीड एक्टर्ससाठी एक नवा सेट असेल. सूत्र सांगतात की, "अनेक लोकं मानतात की  'हीरा मंडी' आणि गंगूबाई काठियावाडी एक एकच आहे. हे सत्य नाही. दोन्ही फिल्म्स वेश्या व्यवसाय करणाऱ्यांची कथा आहे. पण या दोन्ही वेगळ्या स्क्रिप्ट आहेत. जिथे आलिया भट्टचा सिनेमा हा कामाठीपुरामधील गंगूबाई काठियावाडीची कहाणी आहे. तर हीरा मंडी ही लाहौरमधील चार भिंतीच्या आत प्रसिद्ध असलेल्या रेड लाइट परिसरात लपलेल्या संस्कृती संबंधित कहाणी आहे."

भंसाळी हे राणी मुखर्जीसोबत  'हीरा मंडी' बनवणार होते. मात्र ते शक्य झालं नाही. ऐश्वर्या राय बच्चन, प्रीति झिंटा आणि प्रियांका चोप्रासारख्या लीडिंग अभिनेत्रींचं नावही या सिनेमासोबत जोडलं गेलं होतं. मात्र हा प्रोजेक्ट कधी तयार झाला नाही. महेश भट्ट देखील 2007 मध्ये फौजिया सईद यांचं पुस्तक 'तब्बू' वर आधारित एका अशाच कहाणीवर काम करत होते. मात्र ते देखील बंद झालं. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive