PeepingMoon Exclusive: अनुष्का शर्मा तिच्या बॅनरसाठी सनी कौशलसोबत नवदीप सिंहचा प्रोजेक्ट 'Kaneda' ला करणार पुनरुज्जीवीत

By  
on  

निर्माते नवदीप सिंह मागील पाच वर्षांपासून 'कनाडा' बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी 2015मध्ये अनुष्का शर्माची फिल्म NH10च्या रिलीजनंतर गँगस्टर ड्रामाची घोषणा केली होती. 2 वर्षांनंतर अर्जुन कपूर, दिलजीत दोसांझ आणि अनुष्का शर्मा ज्यात लीड रोलसाठी तयार झाले होते. काही कारणास्तव हा सिनेमा बनला नाही. नवदीप सिंह तेव्हापासून या सिनेमाला बनवण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते अजून झालचं नाही.

आता  PeepingMoon.com ला कळालय की नवदीप सिंह अखेर पाच वर्षांनंतर 'कनाडा' ला पुनरुज्जीवीत करत आहेत. आता ते स्वत: सिनेमाचं दिग्दर्शन करणार नाहीत आणि फक्त लेखकाच्या रुपात या सिनेमासाठई सहभागी होतील. अनुष्का शर्मा आणि भाऊ कर्णेश शर्मा जे त्यांच्या क्लीन स्लेट फिल्मज बॅनर अंतर्गत या सिनेमाची निर्मिती करतील. या सिनेमाची टीम आता सनी कौशलसोबत हा सिनेमा बनवत आहेत. ज्याला कबीर खानची पहिली सिरीज 'द फॉरगॉटन आर्मी'मध्ये शेवटचं पाहिलं गेलं होतं. 

प्रोसित रॉय याआधी सोनी पिक्चर्ससाठी झूलन गोस्वामी यांच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्माला दिग्दर्शत करणार होते. त्यांनी यावर्षी जानेवारीत हैदराबादच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये टीजरसाठी शूटिंग देखील केली होती. पण अनुष्का प्रेग्नेंट असल्याने या प्रोजेक्टसाठी खूप वेळ लागतोय. प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंटच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलय की "अनुष्का 2021च्या मध्यापर्यंत कामावर परत येण्याची अपेक्षा आहे. आणि म्हणूनच सामुहिक पद्धतिने हे ठरवलं गेलय की प्रोसित रॉय तोपर्यंत कनाडा च्या प्रोजेक्टवर काम करतील. फिल्मच्या स्क्रिप्टमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. 

 कनाडाला कनाडामधील जातीय रुपातील विविधता असलेला शहर वैंकूवरमध्ये असलेल्या पंजाबी गॅंगस्टरची कहाणी असल्याचं बोललं जात आहे. फिल्मचं टायटल हे नॉर्थ अमेरिकेतील ऐकलं जाणारं पंजाबी उच्चारण आहे. या सिनेमाची शूटिंग पुढील वर्षी मार्च महिन्यात सुरु होईल. या सिनेमासाठी सनी कौशलवर शिक्कामोर्तब झालं असल्याची चर्चा आहे. मात्र इतर महत्त्वाच्या भूमिकांसाठी लवकरच लॉक केलं जाईल.

 

Recommended

Loading...
Share