'कबीर सिंह' नंतर अभिनेत शाहीद कपूर एका चांगल्या प्रोजेक्टच्या शोधात होता. शाहीदकडे सध्या एकापाठोपाठ एक चांगले प्रोजेक्ट्स आहेत. एमेझॉन प्राईमची वेबसिरीज आणि जर्सी सिनेमाचीही चर्चा रंगली आहे. आता पिपींगमून डॉट कॉमला मिळालेलया एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार शाहीदने आणखी एक मोठं प्रोजेक्ट साईन केलं आहे. त्याची शूटींग तो एमेझॉन प्राईमची सिरीज संपल्यावर करेल. सूत्रांनुसार, शाहीद 'रंग दे बसंती' आणि 'भाग मिल्खा भाग' चे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश शर्मा यांचा आगामी सिनेमात कर्ण ही पौराणिक व्यक्तिरेखा साकारतोय. अद्याप या सिनेमाबाबतची सविस्तर माहिती गुलदस्त्यातच आहे.
दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश शर्मा यांना कर्णावर सिनेमा तयार करायचा होता. ते ब-याच मोठ्या कालावधीपासून या विषयावर काम करत आहेत. परंतु बजेट आणि इतर गोष्टी जुळून येत नसल्याने आत्तापर्यंत या सिनेमाच्या प्ररोजेक्टचा श्रीगणेशा झाला नव्हता. आता 'कर्ण' हा शाहीद कपूर आणि मेहरा यांचं एकत्र पहिलं प्रोजेक्ट असेल. निर्माते रॉनी स्क्रूवाला या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळतायत तर ह्यावर्षाअखेरीस या सिनेमाचं शूटींग सुरु होईल असा अंदाज व्यक्त होतोय.
कर्ण हा महाभारतातील कुंती आणि सूर्य यांचा पुत्र होता म्हणून तो सूर्यपुत्र आणि कुंतीपुत्र या नावानेही ओळखला जातो. कर्ण हा दुर्योधनाचा परम मित्र होता.