PeepingMoon Exclusive: 'पठान'नंतर शाहरुख खान करणार दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या सिनेमाचा श्रीगणेशा

By  
on  

जवळपास दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख पठाण या यशराज बॅनरच्या आगामी सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येतोय. पण पठाणनंतर शाहरुख कोणतं प्रोजेक्ट हाती घेतोय. याबद्दलसुध्दा माध्यमांमध्ये बरीच उत्सुकता होती. त्यातच शाहरुख साऊथ दिग्दर्शक एटलीच्या सिनेमाचं शूटींग पठाणनंतर सुरु करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता यात पिपींगमून डॉट कॉमला एक एक्सक्ल्युझिव्ह  वृत्त मिळालं आहे. 

सूत्रांनी पिपींगमूनला दिलेल्या माहितीनुसार  शाहरुख खान हा पठाणचं शूटींग पूर्ण झाल्यावर प्रसिध्द दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा सिनेमा हाती घेतोय. हा एक सामाजिक मुद्द्यावर आधारित असलेला सिनेमा असणार आहे.

यापूर्वी शाहरुख हा राजकुमार हिरानी यांचा सिनेमा करतोय याबदद्लच्या फक्त चर्चा होत्या. कारम तेव्हा स्क्रिप्टसुध्दा फायनल नव्हती. पण आता गोष्टी ब-याच पुढे गेल्या आहेत संपूर्ण प्रोजेक्ट लॉक झालं असून येत्या जून 2021 मध्ये हिरानींचं शाहरुखसोबतचं हे प्रोजेक्ट फ्लोअरवर जाईल असं कळतंय,. 

 

महत्त्वाची गोष्ट ही की शाहरुख खानची निर्मिती असलेल्या 2019 चा सुपरहिट सिनेमा बदलाची नायिका तापसी पन्नूला राजकुमार हिरानी यांनी या प्रोजेक्टमध्ये शाहरुखचा लीड एक्ट्रेस म्हणून निवडलं आहे. पण तापसीने हा सिनेमा अद्याप साईन केला नसल्याचं समजतंय. पण लवकरच तारखांचा मेळ जमल्यावर ती हे प्रोजेक्ट लॉक करेल. 

Recommended

Loading...
Share