Exclusive: वासू भगनानींच्या आगामी ‘सुर्यपुत्र महावीर कर्ण’च्या भूमिकेसाठी रणवीर सिंहची निवड ?

By  
on  

वासू भगनानीने त्यांच्या आगामी ‘सुर्यपुत्र महावीर कर्ण’ या सिनेमाची घोषणा केली आहे. कर्ण या दुलर्क्षित पौराणिक पात्राला पडद्यावर उभं करण्याचं शिवधनुष्य वासू यांची पुजा एंटरटेनमेंट पेलणार आहे. आता पीपिंगमूनला एक्सक्लुसिव्ह ही माहिती मिळाली आहे की, या सिनेमात रणवीर सिंग महावीर कर्णाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

 

 

यावर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यंत भव्य स्तरावर हा प्रोजेक्ट साकारला जाणार आहे. त्यामुळे रणवीरच या भूमिकेसाठी फिट असल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे. रणवीरनेही या प्रोजेक्टसाठी सकारात्मकता दाखवली असली तरी अजून काही ठोस यात समोर आलेलं नाही. 
फायनल नॅरॅशननंतर रणवीर या सिनेमात असेल की नाही हे स्पष्ट होणार असल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे. या प्रोजेक्टवर गेली 5 वर्षं काम सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. आरएस विमल या सिनेमाचं दिग्दर्शन करतील. यापुर्वी 2018, 2016 आणि 2019 मध्ये हा सिनेमा बनवण्याचे प्रयत्न झाले होते. पण काही कारणाने हा सिनेमा पुर्णत्वास जाऊ शकला नाही.

Recommended

Loading...
Share