PeepingMoon Exclusive: अनुष्का शर्माच्या नेटफ्लिक्सवर येणाऱ्या फिल्ममधून या अभिनेत्रीसोबत इरफान खानचा मुलगा करणार डेब्यू

By  
on  

दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे. पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार बाबील हा अनुष्का शर्माची निर्मिती असलेला नेटफ्लिक्सवर येणाऱ्या आगामी सिनेमातून अभिनयात डेब्यू करणार आहे. हा सिनेमा एक सुपरनॅचरल ड्रामा असेल. 'काला' असं या सिनेमाचं नाव असेल. या सिनेमात बाबीलची मुख्य भूमिका असून बुलबुल सिनेमात झळकलेल्या तृप्ती डिमरीसोबत तो या सिनेमात झळकेल. करण जौहरच्या धर्मा कॉर्नरस्टोन एजंसीच्य टॅलेंडमधून आलेल्या तृप्तीसोबत बाबील या सिनेमात झळकले. अन्विता दत्त या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती मागील महिन्यात पिपींगमूनने दिली होती.

 मुख्य म्हणजे बाबील हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याचा डेब्यू करतोय तर दुसरीकडे इतर स्टार किड्स हे सिनेमागृहात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांतून डेब्यू करताना दिसतात. 'करीब करीब सिंगल' या 2017 मध्ये आलेल्या वडिल इरफान खान यांच्या सिनेमात कॅमेरा असिस्टंट म्हणून काम केल्यानंतर आता बाबील हा अधिकृतपणे त्याच्या कामाला सुरुवात करतोय. बाबील आणि तृप्तीने या सिनेमासाठी शूटींग सुरु केलं असून पहिलं शेड्यूलही त्यांनी गुलमर्ग येथे नुकतच पूर्ण केलं आहे. बुलबुलच्या दिग्दर्शिक अन्विता दत्त याचं दिग्दर्शन करत असल्याने अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीदेखील या सिनेमात आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Babil (@babil.i.k)

 

नुकत्याच झालेल्या फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात इरफान खानला जीवनगौरव पुरस्कार घोषित झाला तेव्हा बाबील हा पुरस्कार स्विकारताना भावुक झाला होता. मागील महिन्यातही बाबीलने तो फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री करत असल्याची हिंट दिली होती. मात्र तो याविषयी जास्त काही बोलला नव्हता. 

 नुकतच त्याने सिनेमाच्या सेटवरील फोटो शेयर करत पहिलं शेड्युल पूर्ण झाल्याचं सांगीतलं आहे. या पोस्टमध्ये काही अधिक माहिती नसली तरी पिपींगमूनला मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार बाबील हा क्लिन स्लेट फिल्म्सच्या नेटफ्लिक्सवर येणाऱ्या कालामध्ये झळकणार असल्याचं समोर आलय.

Recommended

Loading...
Share