By  
on  

PeepingMoon Exclusive: अपघात आणि मेडिक्लेम पॉलिसी रिन्यू केल्याबद्दल बॉलीवुडचे स्टंटमेन, फायटर्सनी मानले अक्षय कुमारचे आभार

तो त्याचे एक्शन सीन्स बहुता स्वत:च करतो. फिल्म इंडस्ट्रीच्या स्ंटटमेन आणि फायटर्सच्या मते हा बॉलीवुड सुपरस्टार त्यांचा नंबर 1 हिरो आहे. ते या स्टारचे मोठे चाहते आहेत. लीड एक्टर स्क्रिनवर चांगले दिसावे यासाठी साहसी कृत्य करणाऱ्यांच्या ह्रदयात अक्षय कुमारसाठी खास जागा आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून फिल्म स्टंट असोसिएशनच्या 550 मेम्बर्ससाठी अक्षय हा वैयक्तिक अपघात विमा आणि मेडिक्लेम पॉलिसीसाठी पैसे भरतोय. नुकतच या कारणासाठी त्यांनी अक्षय कुमारचे आभार मानले आहेत. अक्षयने त्यांची आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्सुरन्स कंपनी लिमिटेड पॉलिसीज रिन्यू केली आहे. 
      
अक्षय हा कायम चॅरिटी आणि इतर गोष्टींमधून अतुलनीय काम करत आलाय. त्याच्या दयाळु वृत्तीमुळे तो अनेकांसाठी हिरो ठरलाय. एजाज गुलाब जो असोसिएशनचा जनरल सेक्रेटरी आहे, तो विविध कलाकार, डुप्लिकेट्स, फायटर्स यांची काळजी घेतो. तो सांगतो की, "अक्षय सरांनी मला विचारलं की आमचं इन्सुरन्स आहे का , तर मी म्हटलो नाही. आम्ही प्रयत्न केला पण इन्सुरन्स कंपन्यांनी आम्हाला वगळलं कारण आम्ही आमचं आयुष्य सगळ्या जास्त धोक्यात टाकणारी लोकं आहोत. आम्हाला निराश करण्यासाठी त्यांनी हाय प्रिमियमचा पर्याय दिला ज्याची आम्ही व्यवस्था करु शकत नाही."


अक्षयने एजाजला आश्वासन दिले की तो यागोष्टीकडे लक्ष देईल. आणि त्याच्या बोलण्यानुसार त्याने ते करुनही दाखवलं. त्याने फिल्म स्टंट आर्टिस्ट असोसिएशनच्या 550 मेम्बर्ससाठी ग्रुप अपघात विमा आणि मेडक्लेम इन्सुरन्स पॉलिसी संगठित केले. आणि तेव्हापासून यासाठी अक्षय पैसे देत आहे. पुढे एजाज सांगतो की, "मला माहिती नाही की त्यांनी हे कसं केलं, पण बॉलीवुडमध्ये काम करणारे आमच्या सगळ्या मेम्बर्सचं आता इन्सुरन्स झालं आहे. आमच्यासाठी अक्षय सर हे सुपरमॅन आहेत. त्यांचं ह्रदय मोठ आहे. त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नाही."


फाईट मास्टर अब्बास अली मोघल म्हणतो की एक्शन अक्षयसाठी सोपं आहे. त्यांचं तंत्र परिपूर्ण आहे. ते सेटवर प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेतात. फक्त स्वत:साठीच नाही तर इतरांसाठीही. ते प्रत्येक गोष्टीच्या तपशीलात जातात. खिलाडी 420 मध्ये आम्ही एक सीन चित्रीत केला होता ज्यात अक्षय सरांचं कॅरेक्टर 1000 फिटवर हवेच्या मध्यात विमानावर उभं राहणार होतं. मी चॉपर मधून फॉलो करत होतो. त्यांनी हे स्वत: केलं होतं. अशा थरारपूर्ण स्टंटसाठी डुप्लिकेट आर्टिस्ट  50,000 ते 75,000 इतकं मानधन निर्मात्यांकडून घेतात. पण अक्षय सर अशाप्रकारचे स्टंट केल्यानंतर हे पैसे जमा करून त्या डुप्लिकेटच्या स्वाधिन करतात जे अक्षयच्या जागी स्टंट करणार असतात."

Recommended

PeepingMoon Exclusive