Peepingmoon Exclusive: सिद्धार्थच्या मृत्यूबाबत मिडिया ट्रायलसाठी पोलिसांचा विरोध, परिचितांसोबत चर्चा

By  
on  

मुंबई पोलिस सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचा तपास करत आहे. या संदर्भातील मिडिया ट्रायलसाठी पोलिस अनुत्सुक आहेत. पोलिस तपासात प्रोटोकॉलचं योग्य पालन होताना दिसत आहे. सिद्धार्थचे परिचित आणि गेले काही दिवस त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे. 

 

त्याच्या मोठ्या बहिणीच्या जबाबानुसार, काल त्याला अस्वस्थ वाटत होतं. त्यावेळी कथित गर्लफ्रेंड शहनाज गिलपण त्यासोबत तिथे होती. सकाळी तिनेच सिद्धार्थला बेशुद्ध पाहिल्यावर बहिणीला कळवलं होतं. कूपर हॉस्पिटलचे डॉक्टर शिव आणि निरंजन यांनी सांगितलं की सिद्धार्थचा मृत्यू मध्यरात्री झाला आहे. पोलिस हा तपास करत आहेत की, घरातील लोकांना याबाबत सकाळपर्यंत कल्पना नव्हती. सिद्धार्थच्या मागे दोन बहिणी आणि आई असा परिवार आहे.

Recommended

Loading...
Share