By  
on  

Exclusive: क्वीनचा येतोय नवीन सिनेमा, कोणी घेऊ नका तिच्यासोबत ‘पंगा’

बॉलिवूड क्वीन कंगना रानौत नेहमीच चर्चेत असते. कधी सिनेमे तर कधी खासगी आयुष्यामुळे. आता एक महत्त्वाचं म्हणजे ती आगामी ‘मेंटल’ सिनेमाचं शुटींग लवकरच पूर्ण करणार असून अश्विनी अय्यर तिवारीच्या आगामी सिनेमाचं शुटींग सुरू करतेय. ‘बरेली की बर्फी’ नंतर कंगना पुन्हा अश्विनी यांच्यासोबत काम करणार आहे. ‘पंगा’असं हटके नाव या आगामी सिनेमाचं असून यात तिला एका कब्बडी खेळाडूच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर भारताच्या धर्तीवर या सिनेमाची कथा बेतली आहे. कंगनाची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात ही एक अशा मुलीची कहाणी आहे, जी लग्नानंतरसुध्दा कबड्डी खेळावर तितंकच प्रेम करते. अश्विनी अय्यर यांच्या मते, ‘पंगा’ हे शिर्षक या सिनेमाला अगदी शोभून दिसतंय, तसंच या सिनेमाच्या पूर्व-प्रोडक्शनचं कामसुध्दा सुरू करण्यात आलं आहे.

मागील काही दिवसांपूर्वीच असं वृत्त आहे, कंगनासोबत या दमदार सिनेमात ‘वीरे दी वेडींग’मध्ये करिनाचा नायक म्हणून झळकलेला अभिनेता सुमित व्यासची वर्णी लागणार आहे. जर सुमितला कास्ट करण्यात आलं, तर त्याच्यासाठी ही सर्वात मोठी संधी ठरेल. या सिनेमाच्या शुटींगला यावर्षी ऑक्टोबरमध्ये सुरूवात होणार असल्याचे बोलले जात आहे.

कंगना सध्या तिचा आगमी आणि महत्त्वकांक्षी सिनेमा ‘मणकर्णिका’च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. त्यानंतर ती आपल्या दिग्दर्शनातील पदार्पणाचा सिनेमा ‘तेजू’वर काम करण्याच्या विचारात आहे. जरी अश्विनी यांनी या सिनेमाच्या शुटींगला यापूर्वी सुरूवात केली तरी कंगनाला काहीच प्रॉब्लेम नसल्याचे सांगितले जात आहे.

कंगना रानौत आणि सुमित व्यास यांच्यासोबतच जस्सी सिंह आणि नीना गुप्ता यांच्या या सिनेमात मह्त्त्वपूर्ण भूमिका असतील. कंगनाच्या चाहत्यांना तिच्या या ‘पंगा’ची प्रचंड आता उत्सुकता लागून राहिली आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive