प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या 'आश्रम' या वेबसिरीज तिसरा भाग नुकताच प्रदर्शित केल्यानंतर ते लगेच त्यांच्या आगामी प्रोजेक्टकडे वळले आहेत. प्रकाश झा यांच्या 'आश्रम' वेबसिरीजची सगळीकडेचं जोरदार चर्चा सुरू आहे. यापूर्वी प्रकाश झा यांनी भारताचे माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या जीवनावर आधारित बहुभाषिक वेबसिरिजची घोषणा केली होती, पण त्याऐवजी ते सध्या एका राजकिय नाट्यमय वेबसिरीज वर काम करत आहेत आणि या नवीन वेबसिरीजचं नाव आहे 'लालबत्ती'...
या वेबसिरीज मध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे एका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. लालबत्ती ही वेबसिरीज तरुणांमध्ये असलेल्या सत्तेच्या वेडाबद्दल आहे आणि यात नाना पाटेकर आपल्या भ्रष्ट हेतूंसाठी तरुणांना प्रभावित करणाऱ्या आणि त्यांची दिशाभूल करणाऱ्या एका शक्तिशाली राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रकाश झा यांनी दामुल, मृत्यदंड, गंगाजल अपहरण, राजनीती, आरक्षण आणि सत्याग्रह यांसारख्या चित्रपटांद्वारे अनेक राजकीय आणि सामाजिक विषय हाताळले आहेत. प्रकाश झा यांनी त्यांच्या पहिल्याच 'आश्रम' या वेबसिरीज मध्ये त्यांनी एक स्वयंघोषित गुरू जनतेची कशी दिशाभूल करतो?, महिलांचे कसे शोषण करतो? अंमली पदार्थांचा कसा व्यापार करतो? आणि त्याचबरोबर राजकारणावर देखील कसा नियंत्रण ठेवतो? यासोबचं आजूबाजूचे वास्तवाचे कथन आणि राजकारणाच्या काळ्या बाजूवर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या आगामी 'लालबत्ती'ची सुरुवात सप्टेंबर २०२२ मधये होणार असल्याचे काही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
प्रकाश झा यांच्या आगामी 'लालबत्ती' वेबसिरिजच्या निमित्ताने अभिनेते नाना पाटेकर हे वेबविश्वात पदार्पण करत आहेत. नाना पाटेकर यांनी याआधी प्रकाश झा यांच्या 'अपहरण' आणि 'राजनीती' या चित्रपटांत काम केले आहे. यानंतर प्रकाश झा यांच्यासोबत ते आगामी 'लालबत्ती' या वेबसिरीजमध्ये ते पुन्हा एकदा एकत्र येत आहेत.