By  
on  

'संजू' सिनेमाचे सहाय्यक दिग्दर्शक करणार 'दोस्ताना-2'चं दिग्दर्शन

करण जोहरच्या ‘दोस्ताना’ सिनेमाच्या सिक्वेलच्या चर्चांना एकीकडे चर्चांना उधाण आलं असताना पिपींगमूनच्या हाती एक नवीन खबर लागली आहे. रोज एक ना अनेक बातम्या या सिक्वेलच्या कलाकार आणि दिग्दर्शनाबाबत येत होत्या. पण त्याबाबत नेमकं काय अजुन तरी स्पष्ट झालेलं नाही.

पिपींगमूनला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘दोस्ताना-2’ ची तयारी सध्या सुरू असून निर्माता करण जोहरच्या या सिनेमाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी नाही तर कॉलिन डीकुन्हा करणार आहेत. कॉलिन डीकुन्हा यांनी राजकुमार हिरानी यांना ‘संजू’साठी तर अद्वैत चंदनला सीक्रेट सुपरस्टारसाठी असिस्ट केलं आहे.

दोस्तानाच्या सिक्वेलमध्ये कोणते कलाकार असणार याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही. करण सध्या’ ‘केसरी’, ‘ब्रम्हास्त्र’, ‘तख्त’, ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’, ‘कलंक’ या सिनेमांमध्ये प्रचंड व्यस्त आहेत. अजुनपर्यंत तरी ‘दोस्ताना’ सिक्वेलसाठी कलाकारांच्या नावाबाबत कुठलाच उलगडा झालेला नाही. ‘दोस्ताना’ सिनेमात अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम आणि प्रियंका चोप्रा होते. अभिषेक आणि जॉन रंगवत असलेली दोन पुरुष पात्र एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात. पण त्यांच्यासोबत जेव्हा प्रियंका साकारत असलेली मुलगी आयुष्यात आल्यावर त्याचं आयुष्य कसं बदलतं हे पाहायला मिळालं आहे. हे कलाकार तर सिक्वेलमध्ये नसणार एवढं मात्र नक्की! हा एक रोमॅंटिक कॉमेडी सिनेमा आहे, त्यामुळे सिक्वेलसुध्दा तितकाच धमाकेदार असणार यात शंका नाही.

‘दोस्ताना-2’ सिनेमात कोणत्या कलाकरांना संधी मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. रणवीर सिंहला हा सिनेमा करण्याची इच्छा आहे. त्याला त्याचा फेव्हरेट को-स्टार अर्जुन कपूरबरोबर प्रेमलीला उधळताना मजा येईल, असं बोललं जात होतं. अर्जुन आणि रणवीर या जोडीने ‘गुंडे’ सिनेमात एकत्र धम्माल उडवून दिली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive