Exclusive: रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये कतरिना कैफ आणि अक्षय कुमार रिक्रिएट करणार 'टिप टिप बरसा पानी'

By  
on  

आज जसं सिनेमांच्या रिमेकचा बॉलिवूडमध्ये ट्रेण्ड सुरु आहे, त्याहीपेक्षा जास्त ट्रेण्ड सुरु आहे तो गाण्यांच्या रिमेकचा. नवीन गाणी तयार करण्यापेक्षा थेट जुन्या सुपरहिट गाण्यांना नवा टच देत ती पुन्हा रिक्रीएट करण्याचा जणू सुळसुळाटच झाला आहे. दिग्दर्शक रोहित शे्ट्टी आणि अक्षय कुमार स्टारर बहुचर्चित 'सूर्यवंशी'मध्ये असंच काही एक खास गाणं रिक्रिएट होणार आहे. रोहित आणि अक्षयच्या या अॅक्शपॅक सिनेमाच्या स्टंट्पेक्षा या गाण्याचीच अधिक चर्चा होईल .1994 साली आलेल्या 'मोहरा' सिनेमातल्या 'टीप टीप बरसा पानी' हे पावसात चित्रित झालेलं सुपरहिट गाणं आत्ता 'सूर्यवंशी'मध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफ पुन्हा रिक्रिएट करतील, ही एक्सक्ल्युझिव्ह बातमी पिपींगमून तुम्हाला सर्वप्रथम सांगत आहे. 

 

सध्या हैद्राबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये 'सूर्यवंशी' च्या पुढील शेड्यूलचं शूटींग करतोय. पुढच्याच आठवड्यात तो अक्षय आणि कतरिनासोबत ह्या सेन्सेशनल गाण्याचं शूटींग करण्याची तयारी करतोय. रवीना टंडन आणि अक्षयची अफलातून केमिस्ट्रीतलं हे गाणं पुन्हा एकदा त्याच जोशात प्रेक्षकांमध्ये धूमाकूळ घालेल यात शंका नाही. 

'टिप टिप बरसा पानी'  हे गाणं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या जबरदस्त आवाजात स्वरबध्द झालं होतं. या गाण्यात रवीनाने पिवळी साडी नेसून अक्षयसोबत आपले जबरदस्त जलवे दाखवले होते. आता 'टीप टीप बरसा पानी'  हे गाणं रोहितच्या सिनेमात नव्या अंदाजात रिक्रिएट झालेलं पाहणं म्हणजे एक पर्वणीच ठरेल

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share