Exclusive: 'सूर्यवंशी'च्या रिलीज डेटवरुन अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी यांच्यात कोणतेच मतभेद नाहीत

By  
on  

काही दिवसांपुर्वी रोहित शेट्टी, करण जोहर आणि सलमान यांनी सुर्यवंशीचीरिलीज डेट बदलण्याविषयी ट्वीट केलं होतं. पण त्याच वेळी अक्षयने मात्र हे ट्वीट केलं नव्हतं. यावरून अक्षय रोहितच्या या निर्णयाशी सहमत नसून त्याच्यावर नाराज असल्याचं बोललं जात होतं. पण अक्षयने ट्वीट करून या सगळ्या अफवा असल्याचं बोलून दाखवलं आहे. याशिवाय फॅन्सना आवाहन केलं आहे की अशा अफवा कृपया पसरवू नयेत.

पीपिंगमूनच्या सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे रामोजी फिल्मसिटीमध्ये अक्षय आणि कतरिनाच्या टिप टिप बरसा पानी शुटिंग सुरु आहे. अशा वेळी दिग्दर्शक आणि कलाकारांच्या कोणताही बेबनाव दिसून येत नाही. याशिवाय कोणत्याही बाबीवर असहमतीही दिसून येत नाही. पण तरीही या दोघांमध्ये गैरसमज झाल्याची अफवा सर्वत्र पसरली गेली. या अफवेला सुरुवात रिलीज डेट पासून झाली. यावेळी सलमानच्या इन्शाअल्लाहला टक्कर न देण्यासाथी रोहितने रिलीज डेट २७ मार्च केली. पण ही बाब अक्षयला पसंत न पडल्याची अफवा व्हायरल होऊ लागली. पण अक्षय यासंबंधी ट्वीट करताना म्हणतो, ‘काही खास लोकांकडून माझ्या आगामी सिनेमाविषयी अफवा पसरवल्या जात आहेत. पण या अफवेत कोणतंही तथ्य नाही. मी ‘सुर्यवंशी’ सिनेमाबाबत खुप सकारात्मक आहे.’ अक्षयच्या या स्पष्टोक्ती नंतर अफवेला पुर्णविराम लागेल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share