Exclusive: यासाठी अजय देवगण साजरा करणार नाही दिवंगत वडिलांचा वाढदिवस

By  
on  

सुपरस्टार अजय देवगण सध्या मुलं युग आणि न्यासासोबत इटलीमध्ये आहे. काही दिवसांपुर्वीच अजयच्या वडिलांचं वीरू देवगण यांचं निधन झालं होतं. सिनेसृष्टीतील यशस्वी स्टंटमन अशी वीरू यांची ख्याती होती. उद्या म्हणजेच २५ जुलैला वीरू देवगण यांचा ७७ वा जन्मदिवस आहे. यावेळी अजय वडिलांच्या शांतीसाठी प्रार्थना करणार आहे.


 

वडिलांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अजय जुहू येथील बंगल्यावर पुजेचं आयोजन करित असे. पण यावेळी अजय त्याच्या कुटुंबासहित बाहेर आहे. पण हा दिवस अजय वडिलांच्या आठवणींसोबत काढणार आहे. अजयच्या आयुष्यात त्याच्या वडिलांचं स्थान अनन्यसाधारण आहे. अजयने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं की, ‘माझ्या आयुष्यात खरे सिंघम माझे वडील आहेत’. २५ जूनला लोलो म्हणजेच करिष्मा कपूरचाही वाढदिवस आहे. यशस्वी अभिनेत्री आणि ग्लॅमरस आई असलेली करिष्मा करीना आणि सैफसोबत लंडनमध्ये आहे. त्यामुळे यावेळी लोलोचा वाढदिवस दणक्यात साजरा होणार हे खरं!

Recommended

Loading...
Share