Exclusive: म्हणून अभिनेत्री मनीषा कोईरालाला विकायचंय जुनं घर

By  
on  

अभिनेत्री मनीषा कोईराला गेल्या २० वर्षांपासून मुंबईमधील एका आलिशान डुप्लेक्स घरात राहत आहे. परंतु तिला हे घर बदलण्याची इच्छा असून यापेक्षा चांगल्या आणि भव्य घरात जायची तिची इच्छा आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार मनीषा अंधेरी क्लबच्या समोर एका नव्या बिल्डिंगमध्ये राहण्यास उत्सुक आहे. या बिल्डिंगमध्ये अनेक सेलिब्रीटींना बघितलं जातं. या बिल्डिंगमध्ये हृतिक रोशन आणि हरभजन सिंग यांची घरं आहेत. 

मनीषा ज्या घरात राहण्यास उत्सुक आहे त्या घरावर टेरेस गार्डन असून त्या घरासमोर समुद्राचं रम्य दृश्य दिसतं. आता मनीषा या नव्या घरात राहण्यास कधी जातात, हे लवकरच कळेल. 

मनीषा 'संजू' या सिनेमात दिग्गज अभिनेत्री 'नर्गीस'च्या भूमिकेत झळकल्या होत्या. 

Recommended

Loading...
Share