By  
on  

Exclusive: शाहरुखच्या तिस-या वेबप्रोजेक्टमध्ये अहाना कुमरा दिसणार मुख्य भूमिकेत

शाहरुख सध्या वेब प्लॅटफॉर्मवरील तिस-या वेबसिरीजच्या तयारीत गुंतला आहे. आता या प्रोजेक्टशी जोडलेलं आणखी एक नाव समोर येत आहे. अहाना कुमरा या वेबसिरीजमध्ये फिमेल लीड साकारताना दिसणार आहे. याआधी तिने ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’मध्ये प्रियांका गांधीची व्यक्तिरेखा साकारली होती. ‘बेताल’ असं या वेबसिरीजचं टायटल आहे.

ही भूमिका अहानाच्या करीअरमधील सगळ्यात चॅलेंजिंग भूमिका असल्याचं बोललं जात आहे. याच्या पटकथेवर अजून काम सुरु आहे. या सिरीजच्या शुटिंगला लवकरच सुरुवात होईल. सप्टेंबरपर्यंत या सिरीजचं शेड्युल पुर्ण होईल. ‘बेताल’ हा हॉरर शो असणार आहे. अहानासोबत या वेबसिरीजमध्ये मुक्काबाज फेम विनीत कुमार, सुचित्रा पिल्लई हे कलाकार आहेत. याशिवाय सिद्धार्थ मेनन हा देखील या सिरीजमध्ये दिसेल. हॉलिवूडच्ये स्क्रीन रायटर पॅट्रिक ग्राहम या सिरीजचा एक भाग आहेत. पॅट्रिक यांनी यापुर्वी ‘Ghoul’ ही सिरीज लिहिली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive