By  
on  

नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरणात अभिनेत्री डेझी शाह आज नोंदवणार जबाब

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांच्या गैरवर्तवणुविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आता याप्रकरणी कसून या चौकशीला सुरुवात केली आहे. तनुश्री दत्ताच्या या प्रकरणात अभिनेत्री डेझी शाह ही एक महत्त्वाची साक्षीदार असून पोलिस ओशिवरा ठाण्यातच तिचा जबाब नोंदवणार आहेत. यासाठी मुंबई पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी साक्ष देण्यासाठी आज शनिवारी राहावे म्हणून डेझी शाहला समन पाठविले आहे.

2008 साली हॉर्न ओके सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान  हे प्रकरण घडलं तेव्हा कोरियोग्राफर गणेश आचार्य यांच्यासोबत डेझी शाह सहाय्यक कोरियोग्राफर म्हणून काम करत होती. नाना पाटेकर प्रकरणाबद्दल तनुश्री दत्ताने सर्वप्रथम डेझी शाहलाच सांगितले होते.

मुंबई पोलिस याप्रकरणी कसून चौकशी करुन लवकरच या प्रकरणात योग्य ती कारवाई करणार आहेत.

काय आहे डेझी शाहचं कनेक्शन 

2008 साली हॉर्न ओके सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान कोरियोग्राफर गणेश आचार्य यांची सहाय्यक आणि आत्ताची अभिनेत्री डेझी शाह त्या घटनेवेळेस तेथेच तनुश्रीला स्टेप्स देत होती. नाना आपल्यासोबत डान्स दरम्यान असभ्य वर्तन करत असल्याची सर्वप्रथम कल्पना तनुश्रीने डेझीला दिली होती. मग डेझीने ही माहिती गणेश आचार्य यांना देऊनसुध्दा त्यांनी या प्रकरणाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं तनुश्रीने म्हटलं आहे.

तनुश्रीने पोलिसांना दिलेल्या साक्षीदारांच्या यादीत डेझी शाहचं नाव सर्वप्रथम आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive