Exclusive: ह्र्तिक रोशनसोबत सावलीसारखी असते ही व्यक्ती, जाणून घ्या

By  
on  

कलाकारांभोवती असणारी गर्दी आपल्याला नवीन नाही. सुपरस्टार ह्र्तिक रोशनच्या आसपासही गर्दी कायम असते. पण या गर्दीत त्यासोबत कायम असलेली व्यक्ती म्हणजे आर्फिन खान. सुझानसोबतच्या डिव्होर्सनंतर हृतिकला सांभाळून घेणारी व्यक्ती म्हणजे आर्फिन खान. पण आता हृतिकच्या लवाजम्यात आणखी एका व्यक्तीची भर पडली आहे. पण यावेळी गरज हृतिकच्या मनाला नाही तर शरीराला आहे. हृतिकच्या लवाजम्यात नव्यानेच दाखल झालेली पण सर्वात महत्त्वाची असलेली व्यक्ती म्हणजे त्याचा फिजिओथेरपिस्ट.

ह्र्तिक सध्या टायगर श्रॉफसोबतच्या आगामी अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. पण यावेळी फिजिओ त्याच्यासोबत सेटवर 24 तास हजर असतो. कारण हृतिकला प्रत्येक अ‍ॅक्शन सीन शूट केल्यानंतर काही काळ स्ट्रेचिंग आणि इतर एक्सरसाईज करावी लागते. कारण हृतिकने क्रिश, बॅंग बॅंग, अग्नीपथ सारख्या सिनेमात केलेल्या अ‍ॅक्शनमुळे त्याला गुडघे, पावलं आणि पाठदुखीचा असह्य त्रास होत असतो. दिल्ली आणि सिंगापुर येथे उपचार घेतल्यानंतर हृतिकला सोबत फिजिओ ठेवणं गरजेचं बनलं आहे.  

 

 

Recommended

Loading...
Share