तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपानंतर हाऊसफुल 4 सिनेमाला बरंच नुकसान सोसावं लागलं. बॉलिवूडमध्ये सध्या घोंघावणारं #MeToo वादळात सिनेमाचा दिग्दर्शक साजिद नाडियादवाला यांच्यावरसुध्दा आरोप लागल्यानंतर सिनेमाचं भवितव्य अधांतरीच होतं. पण नंतर साजिदच्या जागी दिग्दर्शक फरहाद सामजी यांची वर्णी लागली आणि शूटींगला पुन्हा सुरुवात झाली.
पण नाना पाटेकर यांची जागा कोण घेणार याबाबत बरीच चर्चा रंगली होती. आता यावरचा पडदा उठला असून पिपींगमून डॉट कॉमला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार लवकरच नानांची जागा साऊथ सुपरस्टार राणा डुग्गुबाटी घेणार आहे.
सध्या अंधेरी लोखंडवाला येथे सुरु असलेल्या शुटींगला राणा डुग्गुबाटी लवकरच जॉईन करणार आहेत. यापूर्वी जॅकी श्रॉफ तर कधी सुनील शेट्टी यांचं नाव चर्चेत होतं. पण अद्याप राणा डुग्गुबाटीच्या नावावर अद्याप हाऊसफुल 4 च्या टीमने शिक्कामोर्तब केलेलं नाही.