Exclusive: करण जोहरच्या 'दोस्ताना 2' मध्ये अभिनेत्री तब्बुचा भाचा फतेह रंधावा नाही झळकणार

By  
on  

'धर्मा प्राॅडक्शन'ची निर्मिती असलेला 'दोस्ताना 2' ची सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमात अभिनेत्री तब्बुचा भाचा फतेह रंधावा अभिनेता कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपुर सोबत बाॅलिवुडमध्ये पदार्पण करण्याच्या चर्चांना उधाण आले होते. 

परंतु आता पिपिंगमुनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह बातमीनुसार फतेह 'धर्मा प्राॅडक्शन'च्या 'दोस्ताना 2' मधुप नाही तर एका अन्य सिनेमातुन बाॅलिवुडच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे या सर्व अफवा होत्या हे आता उघडकीस आले आहे. 

करण जोहरच्या धर्मा प्राॅडक्शन निर्मित 'दोस्ताना 2' या सिनेमात कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपुर प्रमुख भुमिकेत झळकत आहे. यांच्यासोबत तिसरी मुख्य व्यक्तिरेखा कोणाची आहे हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

Recommended

Loading...
Share