Exclusive: सारा-कार्तिकमध्ये नक्की शिजतंय काय? अफेअर कि पब्लिसिटी स्टंट

By  
on  

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनने काहीच दिवसांपूर्वीच ‘लव्ह आज कल’ च्या सीक्वेल संपवलं आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या सिनेमात काम करण्याचा अनुभव अत्यंत खास असल्याचं या दोघांनी काहीच दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा त्यांच्या फॅन्समध्ये सुरु आहे. करण जोहरच्या शोमध्ये कार्तिकला डेट करायला आवडेल असं साराने सांगितल्यापासून या चर्चेला उधाण आलं आहे. पण नक्की ही जोडी डेट करत आहे की सिनेमासाठी पब्लिसिटी स्टंट आहे अशा चर्चाही समोर येत आहेत.

पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार कार्तिकने या नात्यातील रुची केवळ पब्लिसिटीसाठी निर्माण केली आहे. सोशल मिडियावर त्यांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा असली तरी त्याचं भविष्य काय मात्र कुणालाच माहिती नाही. पण सारा आणि कार्तिक बराच वेळ एकमेकांसोबत फोनवर बोलत घालवतात. कार्तिक अनेकदा साराचा सल्ला देखील घेत असतो. तसेच सारा लंडनहून आल्यानंतर कार्तिक तिला आणायला एअरपोर्ट वर देखील गेला होता. यावरून दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होत असली तरी ‘अंदर की बात’ वेगळी असायची शक्यता नाही.

Recommended

Loading...
Share