अभिनेता एजाज खानला ड्रग्स प्रकरणी अटक

By  
on  

हिंदी मालिकांमधील अभिनेता व बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे प्रसिध्दी झोतात आलेला एजाज खान याला बेलापूर येथून अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.एजाजला ड्रग्स प्रकरणी ही अटक करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

पिपींगमूनला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्याजवळ सापडलेल्या ड्रग्सची किंमत जवळपास 2 लाख रुपये आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईलसुध्दा जप्त केले आहेत. एजाज नवी मुंबीतील स्टार हॉटेलमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टी करत असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आलं.

पोलिसांना या हॉटेलात रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती मिळाली होती. जेव्हा त्यांनी या हॉटेलवर छापा मारला, तेव्हा तिथे ड्रग्स सापडले आणि एजाजलाही अटक करण्यात आली. आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

एजाज खानने ‘रक्तचरित्र’, ‘नायक’ आणि ‘रब जैसी कई’ सारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच ‘करम अपना अपना’, ‘कहानी हमारे महाभारत की’ आणि ‘रहे तेरा’ आशिर्वाद सारख्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Recommended

Loading...
Share