Exclusive: 'दो दिल मिल रहे है....मगर चुपके चुपके' या स्टारकिड्सचं जुळतंय सुत

By  
on  

बाॅलिवुडमध्ये कोणाचं नातं कधी बिघडेल आणि कोणाचं सुत कधी जुळेल काही सांगता येत नाही. कधी अफवा एवढ्या जोर धरतात, की खरं काय अन खोटं काय याचा थांगपत्ता लागत नाही. परंतु बाॅलिवुडचा बादशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानबद्दल अशीच एक खमंग माहीती पिपिंगमुनला एक्सक्लुझिव्हरित्या मिळाली आहे. जी माहीती ऐकुन तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

गेल्या काही दिवसांपासुन शाहरुख-गौरीचा सुपुत्र आर्यनच्या अफेअरच्या चर्चा जोरात सुरु होत्या. आर्यन लंडनमधील एका ब्लाॅगरबरोबर रिलेशनशीपमध्ये आहे ही चर्चा होती. पण ही निव्वळ एक अफवा ठरली. पिपिंगमुन वाचकांना एक्सक्लुझिव्हरित्या सांगत आहे की आर्यन सध्या कोणासोबत तरी डेटिंग करत आहे. तुम्हाला वाटत असेल 'ती' नव्या नवेली नंदा आहे. नव्या ही अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चनची मुलगी. परंतु डेट करत असली मुलगी नव्या नाही. 

तर 'ती' कोण आहे हे पिपिंगमुनतर्फे तुम्हाला पहिल्यांदाच करणार आहे . आर्यन हा बाॅलिवुडमधली नवोदित आणि हाॅट अभिनेत्री अनन्या पांडेला डेट करत आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या पहिल्याच सिनेमातून अनन्याने बॉलीवूडमध्ये स्वतःची नवी ओळख निर्माण केली. 

चंकी आणि भावना पांडे यांची मुलगी अनन्या ही शाहरुखची लेक सुहानाची बेस्ट फ्रेंड आहे. आर्यनची आणि अनन्याची लहानपणापासुन चांगली मैत्री आहे त्यामुळे अनन्या आणि सुहानाच एकमेकांच्या घरी जाणं येणं असल्याने अनन्या ही आर्यनची सुद्धा चांगली मैत्रीण आहे. अनन्या आणि आर्यन हे एकमेकांच्या रिलेशनशीप किती गांभीर्याने घेतात याबद्दल निश्चित माहीती नाही,परंतु सध्या ते एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याच्या प्रयत्नात असतात. तरीसुद्धा ते आपल्या नात्याची कुठेही वाच्यता होणार नाही, याची खबरदारी घेतात. 

आर्यन आणि अनन्या हे दोघंही स्वतःच्या आई-वडिलांचा आदर करतात. शाहरुखचा स्वॅग आर्यनमध्ये आला आहे, तर चंकी पांडेंचा खोडकर स्वभाव अनन्यामध्ये असलेला दिसुन येतो. अशा स्वभावाचे हे दोघे एक क्युट कपल वाटतात. त्यांची ही अनोखी जोडी अशीच राहो! आता वडिल शाहरुख खान आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची संमती असेल तर त्यांची जोडी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडेल. 

Recommended

Loading...
Share