By  
on  

Exclusive : साजिद नाडियादवाल्याच्या 'बच्चन पांडे' मध्ये अक्षयसोबत झळकणार क्रिती सेनन?

आज सकाळीच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आपल्या आगामी सिनेमाची दणक्यात घोषणा इंस्टाग्रामवरुन केली. साजिद नाडियादवाला निर्मित बच्चन पांडे हा त्याचा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 2020 रोजी ख्रिसमसला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातील अक्षयचा हा पोस्टरवरचा फर्स्ट लूरक एखाद्या साधू सारखा आणि फारच हटके आहे, त्यामुळे सिनेमाबाबतची उत्सुकता खुपच वाढली आहे.  

साजिद नाडियादवाला यांच्या बच्चन पांडे या बिग बजेट सिनेमाच्या निर्मितीची धुरा फरहाद सामजी सांभाळतायत. अक्षयच्या या आगामी सिनेमाची घोषणा झाली आणि सर्वत्र तिच चर्चा सुरु आहे. सध्या चर्चेत असलेल्या बच्चन पांडे सिनेमात अक्षयसोबत कोणती अभिनेत्री झळकणार याची सर्वांनाच उत्सुकता असेल. पण आम्हाला या अभिनेत्रीबाबतची कुणकुण लागली आहे. पिपींगमूनला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री क्रिती सेनॉन अक्षयसोबत ‘बच्चन पांडे’ मध्ये झळकणार असल्याची दाट शक्यता आहे 

क्रिती सेनन जर अक्षयसोबत  ‘बच्चन पांडे' सिनेमात झळकली तर अक्षयसोबतचा तिचा हा दुसरा सिनेमा ठरेल. ‘हाउसफुल-4’ मध्ये सुध्दा क्रिती सेनन अक्षयसोबतच झळकतेय आणि ह्या सिनेमाची निर्मिती सुध्दा साजिद नाडियादवाला करत असून दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive