बॉलीवूड निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी २० वर्षांनंतर अभिनेता सलमान खानसोबत 'इन्शाअल्लाह' सिनेमाद्वारे काम करत आहेत. या सिनेमात सलमान खान आणि आलीय भट ही नवी जोडी झळकणार आहे. 'इन्शाअल्लाह' ही एक लव्ह स्टोरी असून हा सिनेमा बनवण्याची अनेक वर्षांपासून भन्साळींना इच्छा होती.
संजय लीला भन्साळी भारतासहित अनेक देशांमध्ये 'इन्शाअल्लाह'च्या शूटिंगच्या जागेचा आढावा घेत आहेत. पिपिंगमुनला मिळालेल्या माहितीनुसार येत्या १८-१९ ऑगस्टला मुंबई पासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. मुंबईला शूटिंगच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होईल. या टप्यामध्ये सलमान खान सोबत काही सीन्स चित्रित करण्यात येणार आहेत. तर आलिया भटच्या शूटिंगचा भाग हरिद्वार आणि हृषीकेश येथे होणार आहे.
मुंबई व्यतिरिक्त यूपी, उत्तराखंड आणि अमेरिका आदी ठिकाणी 'इन्शाअल्लाह' शूट केला जाणार आहे. आलिया या सिनेमात २० वर्षांच्या महत्वाकांक्षी अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. तर सलमान एका ४० वर्षांच्या ऑरलँडो आधारित व्यावसायिकाची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा २०२० मधील ईदला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय लीला भन्साळी या सिनेमाबाबत खूप उत्सुक असून सलमान-आलिया ही नवी जोडी प्रेक्षकांना आवडावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.