By  
on  

Exclusive: आयुष्मान खुराना दिसणार अमोल पालेकरांच्या भूमिकेत?

सध्या बॉलिवूडमध्ये यशोशिखरावर कोण असेल,असं म्हटलं तर चटकन आयुष्मान खुरानाचं नाव येतं. अंधाधून आणि बधाई हो या एकामागोमाग एक प्रदर्शित झालेल्या त्याच्या सिनेमाला फक्त प्रेक्षकांनीच नाही तर समिक्षकांनीसुध्दा जबरदस्त पसंतीची पावती दिली. या दोन्ही सिनेमांमध्ये दमदार अभिनय साकारुन आयुष्मान आता प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. म्हणूनच  आता आयुष्मानच्या आगामी प्रोजेक्टकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

पिपींगमून डॉट कॉमच्या हाती आलेल्या एक्सक्लुझिव्ह वृत्तानुसार, आयुष्मानने बीआर स्टुडिओजचा आगामी रोमॅण्टीक कॉमेडी सिनेमा साईन केला आहे.हा ‘छोटी सी बात’ या क्लासिक सिनेमाचा नवीन ट्विस्ट असलेला रिमेक असेल असं सांगण्यात येत आहे.

या निर्मात्यांनी यापूर्वी आयुष्मान खुरानासोबत ‘बरेली की बर्फी’ हा सिनेमा केला होता. आयुष्मान या आगामी रोमॅण्टीक सिनेमात सदाबहार अभिनेते अमोल पालेकर यांची भूमिका साकारणार असून हॅप्पी भाग जाएगी या सिनेमाचे दिग्दर्शक मुद्दसर अजीज या सिनेमाचे शुटींग पुढील वर्षीपर्यंत सुरु करणार आहेत. सिनेमातील इतर कलाकारांचा उलगडा अद्याप झालेला नाही.

सर्वांनाच आता लाडक्या आयुष्मानच्या या आगामी सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहू लागले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive