By  
on  

Exclusive: 'स्टुडंट ऑफ द इयर 2' फेम तारा सुतारीयाचं सुत जुळलंय अदार जैनसोबत?

सध्या बॉलीवूडमध्ये अनेक नवोदित कलाकारांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत आहेत. यातच अभिनेत्री तारा सुतारीयाच्या रिलेशनशिपबद्दलची चर्चा बॉलीवूडमध्ये चर्चेत आहेत. तारा सुतारियाने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या पहिल्याच सिनेमातून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली.

पिपिंगमुनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार तारा सुतारीया रणबीर कपूर आणि करीना कपूर खानचा सख्खा चुलत भाऊ अदार जैनला डेट करत आहे. अदारने २०१७ साली यशराज फिल्म्सच्या'कैदी बँड' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. परंतु या सिनेमाचं आणि त्यातील अदारच्या परफॉर्मन्सची हवी तितकी दखल घेण्यात आली नाही. निर्माता-दिग्दर्शक फरहान अख्तर आगामी कॉमेडी सिनेमातून  अदारला रिलाँच करण्याच्या तयारीत आहे. 

अदारचं याआधी अथिया शेट्टीसोबत नाव जोडलं गेलं होतं. तसेच विनोद मेहरा यांचा मुलगा रोहन मेहरासोबत तारा रिलेशनशिपमध्ये  असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु या सर्व अफवा असल्याचं सिद्ध झाले आहे. तारा आणि अदार हे दोघे हल्ली एकमेकांसोबत फिरताना आणि जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसत आहेत. 

आता तारा आणि अदारचं रिलेशनशिप हे खरंच गंभीर आहे की या निव्वळ अफवा आहेत, हे येणारा काळच ठरवेल 

Recommended

PeepingMoon Exclusive