By  
on  

Exclusive: दाक्षिणात्य दिग्दर्शक शंकर यांच्या अंडरवॉटर वैज्ञानिक सिनेमात शाहरुख खान-हृतिक रोशन झळकणार नाहीत

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक शंकर यांच्या आगामी अंडरवॉटर रोमांचक सायन्स फिक्शन सिनेमात बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. २०१८ मधील रजनीकांत स्टारर '2.0' या सिनेमानंतर शंकर आपल्या या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार होते. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी आगामी सिनेमातील भूमिकेसाठी शाहरुखला विचारणा केली होती. 

शाहरुख खानच्या आधी शंकरने या ऍडव्हेंचर सिनेमासाठी हृतिक रोशनशी सुद्धा बोलणी केली होती. परंतु इतर सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने हृतिकने या सिनेमामध्ये काम करण्यास नकार दिला. या सिनेमातील भूमिकेसाठी शंकर यांनी जैकी चैन, तमिल स्टार थलपति विजय आणि चीनी अभिनेत्री ली बिंगबिंग यांनाही विचारले होते. 

पिपिंगमुनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार किंग खान आणि हृतिक रोशन या सिनेमात काम करणार नाहीत. तसेच शंकर यांचा हा आगामी सिनेमा भारतामधील पहिला अंडरवॉटर सायन्स फिक्शन सिनेमा असणार आहे. एका भव्य ऑक्टोपसच्या कथेची योजना त्यांनी केली आहे ज्याच्याकडे सुपरपावर असतात. शंकरची पटकथा तयार असून या सिनेमातून शंकर तांत्रीक दृष्ट्या दमदार सिनेमा बनवण्याच्या तयारीत आहेत. सध्या शंकर या सिनेमातील प्रमुख भूमिकेसाठी कलाकाराच्या शोधात आहेत. हा शोध संपताच शंकर या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive