By  
on  

Exclusive:अर्जुन-मलायका लवकरच करणार आपल्या नात्याला अधिकृत

सर्वात आधी पिपींगमून डॉट कॉमनेच अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या नात्याची बातमी दिली होती. आता यांच्या नात्यात लवकरच पुढचं पाऊल उचललं जाणार आहे. सध्या दोघंही खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों, याच अंदाजात सर्वत्र फिरताना पाहायला मिळतायत. कालच मलायकाच वाढदिवस साजरा झाला. महत्त्वाचं म्हणजे हा वाढदिवस साजरा करण्यासाठी अर्जुन कपूरसुध्दा मलायकासोबत खास मिलानला गेला होता. मिलान येथे शॉपिंग करतानाचा एक्सक्ल्युझिव्ह फोटो पिपींगमूननेच शेअर केला.

अर्जुन-मलायकाच्या नात्यातील एक अत्यंत महत्त्वाची बातमी पिपींगमूनला एक्सक्ल्युझिव्हरित्या मिळाली आहे. या दोघांचं नातं साजरंकरण्यासाठी जी पार्टी ठेवण्यात आली आहे, त्याची संपूर्ण  माहिती अशी, या दोघांचे जवळचे मित्र इंडस्ट्रलिस्ट आणि सोशलिस्ट मित्र ताज्ञा व अरविंद दुबाश यांच्या वरळीतील सीफेसजवळील घरात या नव्या लव्हबर्ड्सचं नातं साजरं करण्यात येणार आहे.तसंच इथे मालायकाचा पोस्ट बर्थडेसुध्दा साजरा होमार ्सून या दोघांचे जवळचे 20 मित्र या पार्टीत उपस्थित असतील.

या बातमीवरुनच आता हळूहळू अर्जुन-मलायका आपल्या नात्याला अधिकृतचा शिक्का लावून लग्नापर्यंत नेतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive