अजय देवगन आणि अभिषेक बच्चन पुन्हा एकदा एकत्र सिनेमात झळकणार असल्याची खबर चर्चेत आहे. 1990-2000 सालात भारतामध्ये जे आर्थिक बदल झाले त्यावर आधारीत हा वास्तविक सिनेमा असणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमाचं नाव अजुन ठरलं नसलं तरी पिपिंगमुनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहीतीनुसार या सिनेमात अभिषेक बच्चन एका स्टाॅक-ब्रोकर च्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार आहे.
सुत्रांच्या माहीतीनुसार अभिषेकची व्यक्तीरेखा प्रसिद्ध स्टाॅक-ब्रोकर हर्षद मेहताच्या जीवनावर आधारीत आहे. हर्षद मेहताला 1992 साली सुरक्षा क्षेत्रात झालेल्या आर्थिक भ्रष्टाचा-याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अभिषेक ही व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. या सिनेमात इलियाना डीक्रुझ सुद्धा असण्याची चर्चा रंगत आहे, पण त्याविषयी निश्चित माहीती उपलब्ध नाही.
कुकी गुलाटी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर जुही चतर्वैदी आणि अर्जुन धवन हे पटकथा लिहीणार आहेत. हर्षद मेहताचा सामान्य माणुस ते अट्टल गुन्हेगारापर्यंतचा रंजक प्रवास पाहायला मिळणार आहे. 1992 ला बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंज मध्ये जो आर्थिक घोटाळा झाला होता त्यावर सुद्धा या सिनेमात काही प्रसंग असणार आहेत. शेयर बाजारातील जादुगर मानले जाणारे हर्षद मेहताच्या विरुद्ध 27 आरोप दाखल झाले होते. त्यापैकी 4 आरोपाअंतर्गत हर्षद मेहताला दोषी ठरवुन पाच वर्षासाठी त्याला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
अजय देवगन आपल्या प्राॅडक्शनच्या अंतर्गत तसेच 'टोटल धमाल'चे दिग्दर्शक इंद्र कुमार आणि अशोक ठकेरिया मिळुन या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळत आहेत. या वर्षाच्या अखेरीस या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात होणार आहे.