By  
on  

Exclusive: फराह खानच्या आगामी 'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकमध्ये प्रियंका चोप्रा आणि दिपीका पादुकोण झळकणार नाहीत

दिग्दर्शिका फराह खान अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनीच्या 1982 साली गाजलेल्या 'सत्ते पे सत्ता'चा रिमेक करत आहे. या सिनेमात अनुष्का शर्मा आणि दिपीका पादुकोण या दोन अभिनेत्री प्रमुख भुमिकेत झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु पिपिंगमुनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहीतीनुसार दिपीका पादुकोण आणि अनुष्का शर्मा या दोघी या सिनेमाचा भाग नाहीत. 

रोहीत शेट्टी निर्मित या सिनेमासाठी दिपीका-अनुष्काशी करार करण्यात आला होता अशी अफवा चर्चेत होती. परंतु पिपिंगमुनच्या सुत्रांनी सांगीतलेल्या माहीतीनुसार या दोन्ही अभिनेत्री या सिनेमात काम करण्यासाठी उत्सुक नाहीत. तसेच सिनेमातली मुख्य भुमिका हृतिक रोशन करणार आहे की नाही याबाबतीत सुद्धा निश्चित माहीती नाही. 

या सिनेमातील भुमिकेसाठी याआधी कटरीना कैफ आणि प्रियंका चोप्रा यांनाही विचारणा झाली होती. परंतु दोघींनी नकार दिला. या सर्व अभिनेत्रींनी नकार दिल्यानंतर आता कृती सेननचं नाव आघाडीवर आहे. आता या सिनेमात कोणते कलाकार झळकणार याची निश्चित खबर लवकरच कळुन येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive