Exclusive: धनुष आणि सारा अली खानसोबत आनंद राय आणणार ‘रांझणा’चा सिक्वेल ?

By  
on  

 झीरोच्या अपयशानंतर दिग्दर्शक आनंद राय यांनी पुढच्या सिनेमाची तयारी अगदी गुपचुप सुरु केली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि सारा अली खान या सिनेमात झळकणार असल्याची चर्चा आहे. 2020च्या जानेवारीमध्ये या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार असल्याचं समोर आलं आहे. रांझणामधून धनुषने बॉलिवूड डेब्यु केला होता.

 

या सिनेमाशी संबंधित सुत्रांकडून असं समजलं आहे की हा सिनेमा रांझणाचा सिक्वेल नसेल पण ते कथासुत्र पुढे नेणारा नक्कीच असेल. या सिनेमात हृतिक असल्याचंही बोललं जात होतं. पण सुत्रांच्या माहितीनुसार या केवळ धनुष आणि साराच या सिनेमात असणार आहेत. या सिनेमाची निर्मिती आनंद भुषण कुमार यांच्यासोबत करणार आहेत.

Recommended

Loading...
Share