Exclusive: शाहरुख खानच्या वाढदिवसादिवशी होणार ‘टेड टॉक्स इंडिया’च्या दुस-या सीजनचा प्रिमिअर?

By  
on  

बादशाह शाहरुख खान छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी तयार आहे. ‘पिपींगमून’ला मिळालेल्या माहितीनुसार शाहरुखचा चॅट शो टेड टॉक्स इंडिया: नई सोच' या शोचा दुसरा सीझन नोव्हेंबरमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. शो मेकर्स 2 नोव्हेंबर 2019मध्ये शाहरुखच्या 54 व्या वाढदिवसादिवशी हा शोचा प्रिमिअर पार पडणार आहे. 

‘पिपींगमून’ला जवळच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागचा सीझन आठवड्यातून एकदाच प्रसारित होत होता. पण आता शनिवार, रविवार या दिवशी हा शो प्रसारित केला जाणार आहे. मागील सीझनला करण जौहर, एकता कपूर आणि जावेद अख्तर हे कलाकार आले होते. विशेष म्हणजे या शोच्या दुस-या सीझनला कोणताही बॉलिवूड कलाकार हजेरी लावणार नसल्याचं समजत आहे. शाहरुख खान झीरोनंतर रसिकांच्या समोर आला नाही. त्यामुळे त्याचे फॅन्सही त्याच्या पुढील सिनेमाची आतुरतेने वाट पहात आहेत.

Recommended

Loading...
Share