Exclusive: या दिवशी रिलीज होणार अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'हाउसफुल 4' चा पोस्टर आणि ट्रेलर

By  
on  

अक्षय कुमारचे चाहते आहात तर ही बातमी वाचून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. अक्षय कुमारचा आगामी बहुचर्चित 'हाउसफुल 4' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचे निर्माते साजिद नाडियादवाला येत्या २५ सप्टेंबरला  'हॉउसफुल 4' चं पोस्टर तर २७ सप्टेंबरला या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. ज्या लोकांना वाटत होतं की काही कारणास्तव या सिनेमाची रिलीज डेट पुढे जाईल त्यांना ही बातमी वाचून नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. 'हाउसफुल 4' सोबत येत्या दिवाळीत राजकुमार रावचा 'मेड इन चायना' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

 'हाउसफुल 4' चा ऑनलाईन ट्रेलर लाँच इव्हेंट येत्या काही दिवसांमध्ये मुंबईच्या एका आलिशान हॉटेलमध्ये पार पडणार आहे. या इव्हेंटला रितेश देशमुख, बॉबी देओल, कृती सेनान, क्रीती खरबंदा, पूजा हेगडे आदी कलाकार सामील होणार आहेत. 

Recommended

Loading...
Share