#Exclusive: संजय दत्तसोबत एम एस धोनी झळकणार का वायाकॉमच्या कॉमेडी ड्रामामध्ये?

By  
on  

वायाकॉम 18 स्टुडिओज सध्या 'लाल सिंह चड्ढा', 'मोतीचूर चकनाचूर' आणि 'द बॉडी' अशा आगामी प्रोजेक्ट्च्या तयारीत व्यस्त आहे. परंतु आता पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्हरित्या अशी माहिती मिळालीय की, वायकॉम 18 एका नव्या कॉमेडी ड्रामाची तयारी करतोय. अभिनेता संजय दत्त ह्या कॉमेडी ड्रामामध्ये प्रमुख भूमिका साकारतोय अशी रंजक माहिती समोर आली आहे. तर 'यमला पगला दीवाना'चे दिग्दर्शक समीर कर्णिक या आगामी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतोय. 

सूत्रांच्या माहितीनुसार, या आगामी सिनेमाचं नाव 'डॉगहाऊस' आहे. या प्रोजेक्टमध्ये अनेक मोठी नावं  जोडली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतर महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखांसाठी सुनील शेट्टी, इमरान हाशमी आणि आर माधवन यांच्यासोबत चर्चा सुरु आहे.तर 'पदमावत'मध्ये खलनायक साकारणा-या जिम सरभसोबत खलनायकी व्यक्तिरेखेसाठी विचारणा झाल्याचे बोलले जात आहे. इतकंच नव्हे तर क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीला पाहुण्या कलाकाराच्या व्यक्तिरेखेसाठी विचारण्यात आलं असून ह्या महिना अखेरीस सिनेमाची कास्ट पूर्ण होईल. 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share