#Exclusive :  'गंगूबाई कोठेवाली' सिनेमाच्या शुटींगचा भन्साली करणार नोव्हेंबरमध्ये शुभारंभ

By  
on  

सलमान खानसोबत आपला महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट  इशांल्लाह बंद झाल्यानंतर आता आगामी सिनेमाकडे भन्साळींनी सर्व लक्ष केंद्रित केलं आहे.  पिपींगमूनला एक्सक्ल्युझिव्हरित्या अशी माहिती मिळालीय की, येत्या नोव्हेंबरपासून 'गंगूबाई कोठेवाली'  सिनेमा फ्लोअरवर जाणार आहे. आलिया भट या सिनेमात प्रमुख भूमिका साकारतेय.  'गंगूबाई कोठेवाली' सिनेमाची कथा पहिल्यापासून तयार आहे. फक्त आता भन्साळी तिला आलियाच्या व्यक्तिरेखेनुसार त्यात फक्त बदल करत आहेत. भन्साळींनी सर्व प्रोडक्शनच्या कामाला आधापासूनच सुरुवात केली आहे आणि पुढील महिन्यात मुंबईतच ह्या सिनेमाचा सेट उभारण्यात येईल. तसेच या महिनाअखेरीस  'गंगूबाई कोठेवाली' सिनेमाची अधिकृत घोषणा केली जाईल.

'गंगूबाई कोठेवाली'  हा सिनेमा मुंबईतील वेश्यावस्तीवर आधारित असेल.त्यांच्या भोवती सिनेमाचं कथानक फिरेल अशी माहिती सूत्रांकडून कळते. 29 सप्टेंबरनंतर संजय लीला भन्साळी सिनेमाची अधिकृत घोषणा करतील. आलियापूर्वी प्रियांका चोप्रा हा सिनेमा करणार होती परंतु हॉलिवूड कमिटमेंट्समुळे तिला हा सिनेमा करणं शक्य नाही. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia (@aliaabhatt) on

 

Recommended

Loading...
Share