By  
on  

Exclusive: क्रोमॅन किंवा डॉक्टर रिचर्ड नाही तर अक्षय कुमार ‘2.0’ मध्ये साकारतोय ही भूमिका

जेव्हा दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ या बहुचर्चित आणि भारतातल्या सर्वात मोठ्या बिग बजेट सिनेमाचा टिझर व्हिडीओ प्रदर्शित झाला तेव्हा रजनीकांतपेक्षा अक्षय कुमारच्या भूमिकेचीच प्रचंड चर्चा झाली. त्याचे आक्राळ-विक्राळ रुप पाहून नक्की ही भूमिका खलनायकाकडे तर झुकत नाही ना, असाच प्रश्न सर्वांना पडला होता.

दिग्दर्शक शंकर यांच्या या सायन्स फिक्शन थ्रीलर ‘2.0’ सिनेमात अक्षयची भूमिका ही वैज्ञानिक डॉक्टर रिचर्ड असल्याचे पूर्वी सांगितले जात होते तर त्याचा लूक सिनेमात कावळ्यासारखा असल्याने तो क्रोमॅन साकारतोय अशीही चर्चा रंगली होती. पण आता Peepingmoon.com च्या हाती आलेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार अक्षय कुमार या सिनेमात ‘पक्षीराजा’ या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तो सर्व पक्ष्यांचा राजा असल्याने त्या व्यक्तिरेखेला ‘पक्षीराजा’ असं नाव देण्यात आलं आहे.

अक्षय कुमारची ‘पक्षीराजा’ ही भूमिका प्रेक्षकांना या सिनेमाकडे खुप आकर्षित करतेय. तुम्हाला अक्कीच्या या लूकवर प्रचंड मेहनत घेण्यात आलीय. या प्रोस्थेटीक मेकअपसाठी त्याला तासनतास नुसतं बसून रहावं लागायचं. या मेकअपमुळे तो मनुष्य, पक्षी आणि राक्षस या तिघांचा मेळ असलेल्या व्यक्तिरेखेत दिसतोय. अक्षयनेसुध्दा आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना आपण सिनेमात डार्क सुपरहिरो असल्याचे सांगितले होते. तर रजनीकांतनेसुध्दा सिनेमाचा खरा नायक अक्षय कुमारच आहे, असे म्हटले होते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive