Exclusive: अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंगने केली ‘सुर्यवंशी’च्या क्लायमॅक्स शुटिंगला सुरुवात

By  
on  

अ‍ॅक्शन किंग अक्षय कुमारने ‘हाऊसफुल 4’ची उत्सुकता फॅन्समध्ये कायम ठेवून सुर्यवंशमच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. हैद्राबाद इथे रामोजी फिल्म सिटीमधील लोकेशनवर हे शुट पार पडणार आहे. पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार या शुटचं 15 दिवसांचं शेड्युल असणार आहे. रोहितच्या याआधीच्या पोलिस हिरोंपेक्षा अक्षयची भूमिका दमदार असल्याचं बोललं जात आहे.

अक्षय यात लोकल गुंडांचा नाही तर आतंकवादाचा सामना करताना दिसत आहे. मागील वर्षी ‘सिंबा’ नंतर सुर्यवंशीची चर्चा सुरु झाली होती. अक्षयचा या सिनेमात पुन्हा एकदा दमदार अंदाज पाहायला मिळणार आहे. याशिवाय हाऊसफुल आणि गुड न्युज हे सिनेमेही चर्चेत आहेत. सुर्यवंशीमध्ये अक्षयच्या मोहरा सिनेमातील टिप टिप बरसा पानी या गाण्याला रिक्रिएट केलं आहे. अक्षयचे फॅन्स या गाण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील.

Recommended

Loading...
Share