Exclusive: धक्कादायक! सारा अली खान आणि कार्तिक आर्यन या लव्हबर्डस् चं ब्रेकअप

By  
on  

बाॅलिवुडच्या सुंदर आणि क्युट कपलमध्ये सध्या अग्रक्रमाने सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचं नाव घेतलं जात होतं. परंतु यांच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. कार्तिक आणि साराचं गोड रिलेशनशीप आता संपुष्टात आलं आहे. तुम्ही वाचताय ते अगदी खरंय, दोघांचं ब्रेकअप झालं आहे. 

हे दोघेही सध्या इम्तियाज अलीच्या 'लव्ह आज कल 2' चं शुटींग करत होते. त्यामुळे दोघांमध्ये असं काय झालं की त्यांचं नातं संपुष्टात आलं हा प्रश्न सर्वांना पडला आहे. 

काही लोकांच्या मते कार्तिक साराबद्दल जास्त पझेसिव्ह असल्याने साराने कार्तिकला सोडलं असल्याची चर्चा आहे. परंतु या शक्यतांपासुन पिपिंगमून अलिप्त आहे. परंतु कार्तिक आणि सारामध्ये ब्रेकअप झालं असुन त्यांच्यामधलं प्रेमळ नातं संपुष्टात आलं आहे, हे मात्र अगदी खरंय. 

इम्तियाज अलीने 'लव्ह आज कल 2' मध्ये या दोघांची निवड केली. या सिनेमाच्या सेटवर दोघांमध्ये इलु इलु सुरु झालं. त्यानंतर दोघांनीही सोशल मिडीयावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट केले. परंतु यापुढे त्यांच्या फॅन्सना त्यांचे असे फोटोज पाहायला मिळणार नाहीत. त्यामुळे आता फक्त त्यांच्यामधल्या प्रेमाची झलक 2020 मध्ये 'लव्ह आज कल 2' मध्येच बघायला मिळेल

Recommended

Loading...
Share