महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत अनेक तर्क-वितर्क सध्या लावण्यात येत आहेत. नुकताच बिग बींचा 77 वा वाढदिवस त्यांच्या कुटुंबियांनी आणि चाहत्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. पण सूत्रांच्या माहितीनुसार लिव्हरच्या काही समस्येमुळे त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. व त्यांना सर्व सोयींनी सुसज्ज अशा एका खास खोलीत ठेवण्यात आलं आहे. ही खोली जवळपास आयसीयू सारखीच आहे.
पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार त्यांना लिव्हर नव्हे तर यकृता संबंधीच्या काही समस्येसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना रूग्णालयात दाखल करून ३ दिवस झाले असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु आता ते पूर्ण ठीक असून रविवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे.
बॉलिवूडला हे ऐकूनसुध्दा आनंद होईल की, बॉलिवूड पार्ट्यांपैकी एक महत्त्वाची पार्टी बिंग बी म्हणजेच बच्चन परिवाराने 27 ऑक्टोबरला आयोजित केली आहे व अवघं बॉलिवूड त्यांच्या घरी जमणार आहे. त्यापूर्वी बिग बी ठणठणीत होतील यात शंका नाही.