By  
on  

Exclusive: अक्षय कुमारच करणार हेरा फेरी 3, कार्तिक आर्यनबद्दल त्या निव्वळ अफवाच

'हेरा फेरी' च्या दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद लाभला. 'हेरा फेरी 3' सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सिनेवर्तुळात आहे. परंतु आता  'हेरा फेरी 3' मधील अक्षय कुमारची राजुची भूमिका कार्तिक आर्यनला ऑफर झाल्यामुळे दिग्दर्शक प्रियदर्शन आणि निर्माते फिरोज नाडियाडवाला दोघेही आश्चर्यचकीत झाले आहेत. परंतु पिपिंगमुनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह बातमीनुसार 'लुका छुपी' फेम कार्तिक आर्यनला असा कोणताही रोल ऑफर झाला नाही. कार्तिक आर्यनच्या फॅन पेजने ही अफवा पसरवली असल्याची खबर चर्चेत आहे. 

हेरा फेरी सिनेमाशी जोडलेल्या एका नजीकच्या सूत्राने याविषयी खुलासा केला की,''अक्षय कुमार भूल भुलैय्या 2 साठी नाही म्हणाला म्हणून तो रोल कार्तिकला म्हणाला. पण याचा अर्थ असा नाही की अक्षयच्या ऐवजी प्रत्येक भूमिकांमध्ये कार्तिकची वर्णी लागेल. आम्हाला अशी खबर मिळाली आहे की कार्तिक आर्यन अक्षय कुमारला रोल ऑफर झाला आहे. पण त्याला या रोलची ऑफर नेमकी कोणी दिली हे आम्हाला आणून घ्यायचं आहे. त्यामुळे 'हेरा फेरी 3' मध्ये अभिनय करणार असल्याच्या बातम्यांमध्ये काही सत्यता नाही.''

'हेरा फेरी 3' साठी सुनील शेट्टी, परेश रावल हे उत्सुक आहेत. आता यामध्ये अक्षय कुमार झळकणार आहे की नाही याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही.मात्र दिग्दर्शक प्रियदर्शन स्वतः अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टिबरोबर 'हेरा फेरी 3' विषयी बातचीत करत आहेत. आता 'हेरा फेरी 3' मध्ये कार्तिक आर्यनचं नाव हायलाईट कसं झालं याचा शोध'हेरा फेरी 3'चे  फिल्ममेकर घेत आहेत. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive